शाकाहारी असल्याचा आनंदच वाटतो- अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने नुकतेच स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. आपण शाकाहारी असल्याचे तिने एका व्हिडीओमध्ये आवर्जुन सांगितले आहे. आपल्या या निर्णयाचा आपल्याला आनंदच वाटतो आहे. गेल्या तीन वर्षांपासून केवळ शाकाहारी जेवणच घेत आहे. या शाकाहारी जेवणामुळे आपल्याला खूपच स्वस्थ आणि आनंदी वाटत असल्याचा अनुभव मिळतो आहे. आपल्या आयुष्यातल्या चांगल्या निर्णयांपैकी हा एक महत्वाचा निर्णय असल्याचेही तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाकाहारी राहण्याचा निर्णय घेण्यामागे स्वतःच्या आरोग्याचा तर विचार आहेच. पण त्याबरोबर आपल्या भोजनासाठी कोणत्याही सजीवाला जीव गमवावा लागत नसल्याचा सात्विक आनंद मिळतो आहे. शाकाहारामुळे आपल्याला अधिकच आनंदी आणि उर्जा जाणवत असल्याचेही अनुष्काने म्हटले आहे. अनुष्काने अलिकडेच प्राणिहक्क संघटना “पेटा’साठी हा व्हिडीओ शूट केला.

इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला चीअर अप करण्यासाठी अनुष्का पण लंडनला पोहोचली होती. त्याच्या फटकेबाजीबरोबर कॅमेरा सारखा अनुष्कावर स्थिरावत होता. तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ऊर्जा लपून रहात नव्हती. टी-20 सिरीजपाठोपाठ वन डे सिरीजही समाप्त झाली आता टेस्ट सिरीज सुरू होत असताना विराटच्या कॅप्टन्सीचा कस लागणार आहे. त्याचवेळी अनुष्काचा हा व्हिडीओ रिलीज झाला आहे. विराटच्या परफॉर्मन्सवर अनुष्काच्या चीअर अपचा प्रभाव असतो, असे मानले जात असते. अनुष्काचा आणखी एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. “झीरो’चे डायरेक्‍टर आनंद एल. राय यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या अनुष्काने फोटोग्राफर्सला पोझ देत असताना मागून आलेल्या एका व्यक्‍तीने दोन्ही हात उंचावून जोरात आरडा ओरडा केला. त्यामुळे दचकलेल्या अनुष्काच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. हा माणूस म्हणजे दुसरा कोणी नाही, तर डान्स मास्टर जावेद जाफरी होता. त्याने केलेली ही मस्ती अनुष्काला भावली आणि नंतर तिने जावेदला छान आलिंगनही दिले. “झीरो’ मध्ये शाहरुख आणि कतरिना कैफबरोबर अनुष्का दिसणार आहे. दुसरीकडे वरुण धवनबरोबर “सुई धागा’मध्येही ती दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)