सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा जलवा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. अनुष्काचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या फोटोंमधील तिचा अंदाज पाहता अनेक चाहते घायाळ झाले आहेत. सध्या अनुष्का चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनुष्काच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास अनुष्काचा शेवटचा चित्रपट गतवर्षी 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. “झिरो’ या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ झळकले होते. शाहरुख खान स्टार “झिरो’मध्ये अनुष्का शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट फारशे यश मिळवू शकला नाही.

सध्या अनुष्का आपला पती विराट कोहलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असून ती सुट्ट्यांचा मनसोक्‍त आनंद घेत आहे.
दरम्यान, अनुष्काच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. लवकरच तिने यासंबंधी घोषणा करावी याचे ते वाट पाहत आहेत. अनुष्का अभिनेत्रीसोबत एक निर्मातीही आहे. असे म्हटले जाते की, येत्या काळात ती मोठ्या प्रोजेक्‍टची घोषणा करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.