देशातील सामर्थ्यशाली महिला ठरली ‘अनुष्का शर्मा’

मुंबई – अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘फॉर्च्यून इंडिया २०१९’ च्या यादीमध्ये भारतातील सामर्थ्यशाली महिला म्हणून समावेश झाला आहे. नुकतीच फॉर्च्यून इंडिया’ने ही यादी जाहीर केली. यामध्ये तब्बल ५० व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री अनुष्काची वर्णी लागली आहे. फॉर्च्यून इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

दरम्यान, फॉर्च्यून इंडिया’च्या यादीत अनुष्काला ३९ व्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. भारतातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या वार्षिक रँकिंग, त्याचे व्यापारी कौशल्य आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रभाव या सर्व गोष्टींवरुन ही यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये अनुष्काचा परिचयही देण्यात आला आहे

अनुष्का शर्माने २००८ साली ‘रब ने बनादे जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अल्पावधीतच तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावले. तिने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. उत्तम अभिनयासोबतच अनुष्का एक निर्माती सुद्धा आहे. तिच्या निर्मितीखाली ‘एनएच १०’, ‘फिल्लोरी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय डिजीटल प्लॅटफॉर्मवरही तिने एन्ट्री घेतली आहे. सध्या ती एका वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.