बॉलीवूडमधील सेलेब्स हे प्रत्येक सण किंवा दिवस खास पद्धतीने साजरा करत असतात. त्याच प्रमाणे ते “व्हॅलेंटाइन डे’चेही सेलिब्रेशन करतात. यानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबतचा एक सुंदर असा फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. विराट कोहली सध्या इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे.
View this post on Instagram
अनुष्मा शर्माने “व्हॅलेंटाडन डे’निमित्त पती विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर करत एक खास संदेशही लिहिला आहे. अनुष्का शर्माने लिहिले की, मी या दिवसाला जास्त महत्त्व देत नाही, परंतु सनसेटचा हा फोटो शेअर करणे मला जास्त महत्त्वपूर्ण वाटते.
View this post on Instagram
माझ्या प्रत्येक दिवसाचा हा व्हॅलेंटाइन. या फोटोवर असंख्य चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या फोटोला आतापर्यत 10 लाखांहून अधिक जणांनी लाइक केले आहे. एका चाहत्याने लिहिले की, ही माझी सर्वात आवडती जोडी आहे.
View this post on Instagram
दरम्यान, विराट-अनुष्का शर्मा हे नुकतेच 11 जानेवारी रोजी आई-बाबा झाले आहेत. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचे नाव वामिका असे ठेवण्यात आले आहे. याबाबत विराट कोहलीने स्वतः ट्विट करत माहिती दिली होती.
View this post on Instagram