बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. वामिकाच्या जन्मानंतर तिचा चेहरा पाहण्यासाठी विरुष्काचे चाहते खूपच आतूर झाले आहेत; परंतु आपल्या मुलीची ओळख दर्शवणारा फोटो सध्या तरी शेअर न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे.
अर्थात असे असले तरी विराट आणि अनुष्का लेकीचा चेहरा दिसणार नाही, असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतातच. या फोटोंवरही त्यांचे चाहते भरभरून कमेन्ट करत असतात.
View this post on Instagram
अनुष्काने दुर्गाष्टमीच्या मुहुर्तावर वामिकासोबतचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अर्थातच या फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही; परंतु अनुष्काच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.
View this post on Instagram
अनुष्काने फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडिया युझर्सनी भरभरून कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर अनेक कलाकारांनीही त्यावर कमेन्ट केली आहे. अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले की, “दिवसागणिक तू माझ्यापेक्षा जास्त साहसी होत चालली आहे.
तुझ्यामध्ये देवीमातेची ताकद येवो… माझी प्रिय वामिका…’ या दोघींचा हा सुंदर फोटो पाहून रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, जेनेलिया डिसुजा, ताहिरा कश्यप, सुनील शेट्टी, अथया शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेन्ट केल्या आहेत.