मुंबई – चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कश्यप यांनी मात्र हा आरोप धुडकावून लावला होता. काही दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन पायलने ही तक्रार दाखल केली होती. तर यातच आता मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत.
Mumbai Police summons film director Anurag Kashyap (in file photo) asking him to appear at Versova Police station tomorrow at 11 am, in connection with the alleged sexual assault against actor Payal Ghosh. pic.twitter.com/JLnlgO6Pzb
— ANI (@ANI) September 30, 2020
पायलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कश्यप यांच्या विरोधात कलम 376 (1) बलात्कार, 354 विनयभंग व जबरदस्ती, 341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला होता .यातच अपोलिसांकडून अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत. असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अभिनेत्री पायल घोषने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले.