श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या जनतेचा अटलजींपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्त विश्वास आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. गेल्या ७० वर्षात देशातील अन्य राज्यांनी प्रगती केली. मात्र जम्मू काश्मीरमध्ये केवळ बॉम्बस्फोट आणि दहशतवादच होता. काश्मीरी पंडितांना यातना देऊन त्यांना काश्मीरमधून पलायन करण्यास भाग पाडले अशी टिप्पणही ठाकूर यांनी केली.
कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवर टीका करताना ते म्हणाले काश्मीरमध्ये आता कलम ३७० परत येऊ शकत नाही. यांना (कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स) यांना हे कलम यासाठी परत हवे आहे की त्यामुळे त्यांना दहशतवादी आणि दगडफेक करणाऱ्यांना परत आणता येऊ शकेल. हे दोन्ही पक्ष कट रचून पुलाव तयार करत आहेत. आम्ही जम्मू काश्मीरला दहशतवादातून बाहेर काढले आहे. आता आम्ही त्याला पुढे नेऊ. राज्यात डबल इंजिनचे सरकार येईल. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसचा अर्थ आहे राज्यावर संकट तर याउलट भारतीय जनता पार्टीचा अर्थ आहे संकटातून सुटका.
दोन्ही विरोधी पक्षांना लक्ष्य करताना अनुराग ठाकूर म्हणाले की या लोकांचे काम आहे अफजल गुरूचे गुणगान करणे. त्यांच्याकडे राज्याच्या विकासाची कोणतीही रूपरेषा नाही. त्यामुळेच त्यांना शंकराचार्य यांचे नाव बदलून तख्ते सुलेमान करायचे आहे. फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांना कॉंग्रेसला सोबत घेऊन पीएसए संपुष्टात आणायचे आहे. दहशतवादी, अमली पदार्थांची तस्करी करणारे, दगडफेक करणारे, विभाजनवादी यांची सुटका करायची आहे. त्यावरूनच हे स्पष्ट होते की त्यांना जम्मू काश्मीर हे राज्य आणखी पिछाडीवर न्यायचे आहे. पाकिस्तानचे ते समर्थन करतात. त्यामागे त्यांची काय अपरिहार्यता आहे? आम्हाला शांतता, प्रगती आणि समृध्दी हवी आहे.