अनुराग, समृद्धी, संजय, कविता यांना विजेतेपद

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा

पुणे: अनुराग कोंकर, समृद्धी राजपूत, संजय पंडित व कविता रेड्डी या धावपटूंनी आपापल्या गटांत विजेतेपद संपादन करताना चौथ्या एनआयओ व्हिजन अर्धमॅरेथॉन स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थेलमॉलॉजी (एनआयओ) आणि रनबडीज क्‍लब यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुष व महिलांच्या खुल्या व वरिष्ठ गटांत 5 कि.मी, 10 कि.मी, 15 कि.मी आणि 21 कि.मी. या प्रकारांत पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 1500 धावपटू सहभागी झाले होते यामध्ये 600 ब्लाईंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. अर्ध मॅरेथॉन (21 किलोमीटर) पुरुष खुल्या गटात अनुराग कोंकरने पहिला, तर हिरेन पटेल व हरीशचंद्र लोहटकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात समृद्धी राजपूतने, तर पुरुष व महिला वरिष्ठ गटांत अनुक्रमे संजय पंडित व कविता रेड्डी यांनी विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचा मार्ग रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्स, बाणेर येथून सुरुवात होऊन औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्स, बाणेर असा मार्ग होता. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ व्हीआयपी सेक्‍युरिटीजचे आयजी कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओ व्हिजनचे डॉ.श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर, रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्सच्या मुख्याध्यापिका जमुना गरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रनबडीज क्‍लबचे अरविंद बिजवे, निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)