बॉलीवूडमधील अभिनेत्री सैयामी खेर हिने प्रसिद्ध डायरेक्टर ओमप्रकाश मेहरा यांच्या “मिझर्या’मधून चित्रपटसृष्टीत कारर्किद सुरू केली आहे. आता ती लवकरच अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपटात झळकण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
निर्माता अनुराग कश्यप यांनी नुकतीच नवीन प्रॉडक्शन कंपनीची स्थापना केली आहे. या प्रॉडक्शन हाउसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आगामी प्रॉजेक्टची घोषणा केली होती. या चित्रपटाबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. परंतु या चित्रपटात मळयालम चित्रपटातील अभिनेता रोशन मॅथ्यू मुख्य भूमिका साकारू शकतो.
रोशन मॅथ्यूने अनेक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान, सैयामी खेर यापूर्वी मराठामोळा अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत “माउली’ या चित्रपटात झळकली होती. तसेच सैयामी खेरच्या पहिल्या चित्रपटात तिच्यसोबत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने लीड रोल साकारला होता.