मुंबई – लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अनुराग कश्यपची आज आठ तास चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत वर्सोवा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते.
पायल घोषने अनुरागवर आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज अनुरागची चौकशीला हजर झाला असता 11 वाजता चौकशीला सुरूवात करण्यात आली. ही चौकशी सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरू होती.
या चौकशीत अनुरागकडून पायल घोषशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते फोन मेसेजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. तसेच लैंगिक अत्याचाराबाबतही चौकशी करण्यात आली.
दरम्यान, ‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले आहे. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत, असे ट्विट करत अनुराग कश्यपने पायलला उत्तर दिले होते.