अनुराग कश्‍यपला जिवे मारण्याची धमकी

मुंबई – देशात वाढत्या मॉबलिंचिंगच्या घटनांवर चिंता व्यक्त करत 49 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले होते. यामध्ये बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्‍यप याचादेखील समावेश होता. आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून त्यांनी पत्र शेअर केल्यानंतर एका ट्‌विटर युझरने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

नुकतीच मी माझ्या रायफलची आणि शॉटगनची सफाई केली आहे आणि तिला अनुरागला समोरासमोर भेटण्याची इच्छा होत आहे, अशा आशयाचे ट्‌विट एका युझरने केले आहे. दरम्यान, अनुराग कश्‍यपने त्वरित हे ट्‌विट मुंबई पोलिसांना फॉरवर्ड केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनीही या ट्‌विटची गंभीर दखल घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.