Anurag Kashyap | प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या दमदार चित्रपटांमुळे ओळखला जातो. अनुराग कश्यपने स्टार किड अभिनेत्री अन्यया पांडेचे कौतुक केले आहे. अनन्याचा CTRL हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. विक्रमादित्य मोटवानीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
अनन्या पांडे आणि विहान सामत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे कौतुक करताना अनुराग कश्यपने दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांचेही कौतुक केले आहे.
अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या नोटमध्ये अनुराग कश्यपने लिहिले की, ‘मोटवानी एका शानदार चित्रपटासह परतला आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही त्याने तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि एक उत्तम कथा घेऊन आला आहे. मोटवानी हा माझ्यासाठी नेहमीच चांगला माणूस राहिला आहे. मी कधीही त्याच्याकडे जायचो आणि तो मला कॅमेरा, साउंड आणि डिझाईनसाठी नेहमी मदत करत असे.’ Anurag Kashyap |
‘मोटवानी सर्वांच्या एक पाऊल पुढे आहेत. आता त्याने सीमा ओलांडल्या आहेत आणि एक थरारक कथा सांगितली आहे. या सिनेमात अनन्या पांडेने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय केला आहे. या अद्भुत कार्याबद्दल मी मोटवानी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो,’ असे अनुराग कश्यपने लिहिले आहे. Anurag Kashyap |
View this post on Instagram
देविका वस्ता यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यासोबतच समित गंभीरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. लोकांनीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच समीक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे. अशा प्रकारचा हा अनोखा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून अनन्या पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडेच ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमध्ये दिसली. ही तिची पहिलीच सीरिज होती.