Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असलेल्या आलियाच्या लग्नापूर्वीच्या विधीही सुरू झाल्या आहेत. अनुरागने मुलीच्या हळदीचा फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे.
व्यवसायाने ब्लॉगर असलेल्या आलिया कश्यपच्या लग्नाच्या विधी ८ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. तिचे वडील अनुराग कश्यप यांनी याची झलक दाखवली आहे. अभिनेता-दिग्दर्शक अनुरागने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी आलियाच्या हळदी समारंभाचा फोटो शेअर केला आहे. Anurag Kashyap |
View this post on Instagram
दरम्यान,अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आलिया कश्यप 23 वर्षांची आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया कश्यप तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी आलियाने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी साखरपुडा केला होता. आता हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. Anurag Kashyap |
आलिया कश्यपच्या हळदी समारंभराला जान्हवी कपूरची बहीण आणि अभिनेत्री खुशी कपूर देखील उपस्थित होते. यावर अनेकांनी आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तिने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. त्याच वेळी, शेनने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे. आलिया कश्यप 11 डिसेंबरला शेनसोबत मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्समधील बॉम्बे क्लबमध्ये लग्न करणार आहे.
अनुराग कश्यपचा जावई आणि आलिया कश्यपचा होणारा नवरा शेन ग्रेगोयर 24 वर्षांचा असून तो अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही सॉफ्टवेअर कंपनी साउंड डिझायनिंगचं काम करते.
हेही वाचा: