मुंबई- सोशल मीडियावर नेहमीच विविध आणि सामाजिक मुद्यांनावर आपले मत व्यक्त करणारा बॉलिवूड दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ने आज ट्विटरला राम राम ठोकला आहे. अनुराग कश्यपने आज आपले अधिकृत ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. आपल्या परिवाराला येणारे सतत धमकीचे फोन आणि मेसेज या कारणामुळे अनुरागने हे पाऊल उचललं असल्याचं त्याने सांगितलं आहे.
आपलं ट्विटर अकाउंट डिलीट करण्यापूर्वी अनुराग कश्यपने दोन पोस्ट केल्या आणि त्यामध्ये ट्विटर डिलीट करण्यामागचं कारणंही स्पष्ट केलं आहे.