Anurag kashyap | बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने अखेर मुंबई सोडली आहे. आता तो दुसऱ्या शहरात स्थायिक झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने इंडस्ट्री सोडणार आणि मुंबईपासूनही दूर जाणार असल्याचे सांगितले होते. हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल त्याने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. यापुढे अशा वातावरणात काम करण्याची इच्छा नाही, जिथे कलेपेक्षा अधिक पैशांना महत्त्व दिले जाते, असल्याचे त्याने म्हंटले होते.
मिडिया रिपोर्टनुसार, मुंबई सोडल्यानंतर आता अनुराग कश्यप बंगळुरू येथे राहत आहे. द हिंदूशी बोलताना तो म्हणाला, “मी मुंबई सोडली आहे. मला सिनेइंडस्ट्रीमधील लोकांपासून दूर राहायचं आहे. इंडस्ट्री आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती विषारी झाली आहे. प्रत्येक जण टारगेटच्या मागे धावत आहे. प्रत्येकाला फक्त ५०० आणि ८०० कोटींचा सिनेमा बनवायचा आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह वातावरण राहिलेलं नाही”.
‘द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप म्हणाला होता की, “आता इथे सिनेमा बनवण्यात काही मजा राहिली नाही. सहा वर्षांपूर्वी बनवलेला सिनेमा जशाच्या तसा आज बनवायचा झाला तर तेव्हापेक्षा सहापट जास्त खर्च होईल. यात सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे सिनेमा बनवण्यात आता मजा राहिलेली नाही कारण आता सगळं पैशात मोजलं जात आहे. आता बाहेर जाऊन सिनेमा बनवणं माझ्यासाठी कठीण आहे. सुरुवातीपासून आपला सिनेमा कसा विकला जाईल याकडेच लक्ष दिलं जात आहे. Anurag kashyap |
पुढे ते म्हणाले, “सिनेमा बनवण्यात जी मजा आहे ती संपत चालली आहे. म्हणूनच मला आता इथून बाहेर पडायचं आहे. मी मुंबईतून बाहेर पडणार आहे. मी आता साऊथला जाणार आहे. मला तिथे जायचंय जिथे मला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. नाहीतर मी म्हाताऱ्या माणसासारखा इथेच मरेन. आपल्याच इंडस्ट्रीत जे सुरु आहे ते मला पटत नाहीए आणि मी अक्षरश: निराश झालो आहे.”
अनुराग कश्यपचे आगामी चित्रपट
अनुराग कश्यपने गँग्स ऑफ वासेपूर, देव डी, ब्लॅक फ्रायडे यांसारख्या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या, अनुराग कश्यप मल्याळम चित्रपटाच्या ‘फुटेज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सौजू श्रीधरन यांनी केले आहे. या चित्रपटात मंजू वॉरियर, विशक नायर आणि गायत्री अशोक सारख्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज झाला, परंतु त्याची हिंदी आवृत्ती 7 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. Anurag kashyap |
याशिवाय येत्या काळात अनुराग कश्यपला अभिनेता म्हणूनही पाहिले जाईल. तो ‘डकैत’ या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये केले जात आहे. या चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
हेही वाचा: