मुंबई – ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले. इतके की, पहिल्या सीझननंतर याचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले होते. अखेर दुसरा सीझनही आला आणि लोकांनी तो डोक्यावर घेतला. आता प्रतीक्षा आहे की, या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची. तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे. होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन बनणार नसल्याचा खुलासा दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने केला आहे.
सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची वेब सीरिज सेक्रेड गेम्सला चांगलीच पसंती मिळाली होती. या वेब सीरिजचे दोन सीझन आले होते आणि दोन्ही सीझन प्रेशकांना खूप आवडले होते. काही दिवसांपासून सेक्रेड गेम्सचा सीझन 3 येणार असल्याच्या बातम्या येत होत्या ज्याला दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने अफवा म्हटले आहे.अनुरागने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून बनावट कास्टिंग कॉलचा पर्दाफाश केला आहे.
अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट
अनुरागने लिहिले की, तो हे फेक खाते चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवणार आहे, त्यानंतर या व्यक्तीने लगेच त्याचे खाते निष्क्रिय केले. सेक्रेड गेम्सच्या तिसर्या सीझनचे खंडन करताना, अनुरागने पोस्ट शेअर केली आणि कॅप्शन लिहिले, “हा माणूस राजबीर-कास्टिंग एक घोटाळा करणारा आहे. सेक्रेड गेम्सचा कोणताच तिसरा भाग येणार नाही. मी या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करेन.” आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, कृपया या घोटाळ्यापासून सावध रहा, सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन होत नाही आहे.