चिंबळी – चिंबळी (ता. खेड) येथील जैद पाटील एज्युकेशन सोसायटी व शांताई मेमोरियल स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष अनुराग जैद यांची चिंबळी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल चिंबळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने माजी चेअरमन ज्ञानेश्वर कड व तज्ज्ञ संचालक बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक व सदस्य तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय