नवी दिल्ली – केरळच्या तिरुअनंतपुरम शहरातील एका महिलेने बॉलिवूडची दिग्गज पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव करमाला असून या महिलेने जिल्हा कुटुंब न्यायालयात खटला दाखल केला आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. १९७४ मध्ये जन्माला आलेल्या करमालाने असा दावा केला आहे की, अनुराधाने तिला तिच्या सध्याच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. जेव्हा ती फक्त ४ दिवसांची होती.
महिलेचे म्हणणे आहे की, अनुराधाचे बिजी सिंगिंग शेड्यूल आणि करिअरमधील यशामुळे अनुराधा करमालाचे पालनपोषण करू शकत नव्हती. म्हणून अनुराधाने असे केले. पद्मश्री आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती अनुराधा पौडवाल यांचे अरुण पौडवाल यांच्याशी लग्न झाले होते. १९५२ मध्ये जन्मलेल्या अनुराधा आता ६७ वर्षाच्या आहेत.
महिलेचा दावा काय?
सुमारे पाच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला सत्य सांगितल्याचा दावा करमाना मोडेक्सने केला आहे. ” आहे. मी फक्त चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझ्या पालकांकडे सोपवलं होतं, असं वडिलांनी आपल्याला सांगितल्याचं करमाला म्हणाली. “पोंनाचन सैन्यात होते आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात होती. ते अनुराधा पौडवाल यांचे मित्रही होते. मग त्यांची बदली केरळमध्ये झाली,” असंही करमालाने सांगितलं.
करमाला मोडेक्सच्या माहितीनुसार, याबाबतचं सत्य माझी आई अॅग्नेसलाही माहित नाही. पोंनाचन आणि अॅग्नेस यांना तीन मुलं आहे. त्यांनी करमालाचं पालनपोषण आपल्या चौथ्या अपत्याप्रमाणे केलं. 82 वर्षीय अॅग्नेस सध्या अंथरुणाला खिळल्या असून त्याअल्झायमरने ग्रस्त आहेत.