भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, एका महिला मंत्रीने घेतली प्रियंका गांधींची भेट

नवी दिल्ली – देशात आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी उत्तर प्रदेश राज्यात भाजपला आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अपना दल हा भाजपचा मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची चिन्हे आहेत. अपना दल हा पक्ष येत्या 28 फेब्रुवारी रोजी एनडीएत रहायचं की नाही ? याबदल निर्णय घेणार आहे.

अपना दल पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतीच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकी दरम्यान काँग्रेसचे पश्चिम युपीचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते.

दरम्यान, अपना दल-सोनेलाल के राष्ट्रीय अध्यक्ष आशीष पटेल यांनी लखनऊमध्ये म्हटले की, आमचा पक्ष वर्ष 2014 पासून भाजपासोबत आहे आणि प्रामाणिकपणे यूतीचा धर्म पाळत आहे, मात्र यूपीमध्ये भाजपाने आम्हाला योग्य सन्मान दिला नाही.

पुढे आशीष पटेल यांनी चेतावनी दिली की, भाजप आपल्या वागण्यात बदल करावा, नाहीतर आमच्या नेत्या (अुनप्रिया पटेल) कोणताही निर्णय घेऊ शकतात. ते जो काही निर्णय घेतील त्याचं पूर्ण पक्ष समर्थन करतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल या पक्षाने 2014 च्या निवडणुकीत भाजपासोबत युती केली होती. तेव्हा भाजपाने अपना दलसाठी लोकसभेच्या 7 जागा दिल्या होत्या, यापैकी 2 ठिकाणी अपना दलाचे खासदार विजयी झाले होते. तर 10 ते 12 ठिकाणी या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे हा पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यास या भागात भाजपाची डोकेदुखी वाढू शकते, असं सांगितल जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)