अनूप जलोटांची गर्लफ्रेंड पुन्हा चर्चेत

मुंबई – अनूप जलोटा यांची कथित गर्लफ्रेंड आणि टेलिव्हिजन विश्वातील सर्वात विवादित शो “बिग बॉस’ची स्पर्धक जसलीन मथारू हिने आपला वाढदिवस साजरा केला. जसलीन संपूर्ण बिग बॉस 12′ शोदरम्यान चांगलीच चर्चेत होती. अनूप जलोटा आणि जसलीनच्या अफेअरची मागील सीजनमध्ये खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता जसलीनने नुकताच आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो जसलीनने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जसलीन तिच्या या फोटोजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

4 एप्रिल 1990 साली पंजाबी परिवारातून आलेल्या जसलीनचा जन्म मुंबईत झाला. संगीताची लहानपणापासून आवड असणाऱ्या जसलीनने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. जसलीनने वयाच्या 16 वर्षी कॉलेजमध्ये बेस्ट फिमेल सिंगरचा पुरस्कार पटकावला होता. अनेक नामवंत कलाकारांसोबत जसलीनने काम केले आहे. मीका सिंह, सुखविंदर सिंह, अमजद खान यांसारख्या गायकांसोबत तिने स्टेज शेअर केला आहे.

जसलीन “बिग बॉस 12’मधून सर्वात जास्त चर्चेत आली. जसलीनचे नाव या शोमध्ये भजन सम्राट अनूप जलोटा यांच्यासोबत जोडण्यात आले होते. जसलीन ही अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड बनून शोमध्ये दाखल झाली होती. या शोसह संपूर्ण देशातच अनूप जलोटा आणि जसलीनची जोडी चर्चेचा विषय बनला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.