इंडियन आयडलमधून अनू मलिकची एक्झिट, ‘या’ गायकाची होणार एन्ट्री

मुंबई – सोनी टेलिव्हजन वरील प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल’ने आजवरच्या सर्वच सिंगिंग कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले आहे. इंडियन आयडलचे आजवरचे सर्वच सिझन हिट गेले आहेत. यंदाचा सिझन मधील सगळ्याच स्पर्धकांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. यंदाच्या सिझन मध्ये प्रसिद्ध गायक अनू मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी परीक्षकाची भूमिका बजावत होते.

दरम्यान ‘इंडियन आयडल 11’ मधून गायक अनू मलिक यांनी एक्झिट घेतली आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर मीटू मोहिमेअंतर्गत काही आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे या आरोपांना कंटाळून अनु मलिक यांनी इंडियन आयडॉल मधून एक्झिट घेतली आहे.

पण आता या कार्यक्रमात अनू मलिक यांची जागा ‘हिमेश रेशमिया’ने घेतली आहे. या आठवड्यापासून प्रेक्षकांना हिमेश ‘इंडियन आयडल 11’ मध्ये दिसून येणार आहे. या वर्षीच्या ‘इंडियन आयडल’चे थीम ‘एक देश एक आवाज’ असून या आठवड्यात 90 च्या दशकातील गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि गायिका अनुराधा पौडवाल उपस्थित राहाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.