जवळजवळ २ वर्षे आपण करोना विषाणूच्या संकटाशी झुंजत आहोत. भारताबद्दल बोलयचं तर आजही दररोज सुमारे 40 हजार करोना प्रकरणे येथे येत आहेत, ज्यामुळे प्रत्येकाची चिंता वाढत आहे. त्याचवेळी, तज्ञांनी आधीच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे आणि ही लाट भारतात कधीही येऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकजण धास्तावलेले आहेत.
आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की करोनाची लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण एक प्रकारे ते करोनाला रोखण्यात खूप मदत करते आणि दुसरे म्हणजे लस घेतल्यानंतर असे दिसून आले आहे की लोकांचा मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर एक नवी बातमी आहे की आता करोनावर मात करण्यासाठी लसीनंतर ‘अँटिव्हायरल गोळ्या’ येऊ शकतात. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
एका अहवालानुसार दक्षिण स्वीडनमधील सर्वात मोठ्या सायन्स पार्कपैकी एक, मेडिकॉन व्हिलेज सध्या ओरल (तोंडाद्वारे घ्यायच्या) अँटीव्हायरल गोळ्या तयार करत आहेत. या गोळ्या करोनाची लक्षणे आणि धोका दोन्ही कमी करण्यास मदत करू शकतात. असे म्हटले जात आहे की या गोळ्या खूप उपयुक्त ठरू शकते आणि करोनापासून वाचण्यासाठी लोकांना खूप मदत करू शकतात.
अँटीव्हायरल गोळ्या म्हणजे काय?
मीडिया रिपोर्टनुसार, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत ते करोनाचे अँटीव्हायरल गोळ्या घेऊ शकतील. विशेष म्हणजे रुग्ण घरात राहूनच या गोळ्या घेऊ शकतील. या गोळ्या त्यांची लक्षणे रोखण्यात आणि बिघडलेले आरोग्य बरे करण्यात मदत करेल. त्याच वेळी, सौम्य लक्षणांवर ते अधिक प्रभावी होईल. लस शरीरात विषाणूच्या प्रवेशास प्रतिबंध करते, तर अँटीव्हायरल गोळ्यादेखील संसर्गानंतर विषाणूला रोखू शकतील.
ती लसीपेक्षा कशी वेगळी आहे?
करोना लस विषाणूविरूद्ध सर्वोत्तम संरक्षण प्रदान करते तर दुसरीकडे, अँटीव्हायरल गोळ्या करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकतात.
अँटिव्हायरल गोळ्या कधी येऊ शकतात ?
मीडिया रिपोर्टनुसार, अँटीव्हायरल औषध या वर्षीच बाजारात आणले जाऊ शकते. त्याच वेळी, अमेरिकन केमिकल कंपनी ‘मर्क’ने मौखिक अँटीव्हायरल औषध मोलनूपिरावीरसाठी एफडीएची मान्यता आधीच मिळवली आहे.
दुसरीकडे, जपानच्या फार्मा कंपनीने अलीकडेच एक दिवसाच्या गोळीवर क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. तथापि, हे अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे यायला काही वेळ लागू शकते.