आपणास हे माहित आहे काय?

अँटीगुआ आणि बारबुडा या देशाचे नागरिक होण्यासाठी एक कोटी 30 लाख रुपये (दोन लाख डॉलर) त्या देशाच्या राष्ट्रीय विकास फंडात जमा करावे लागतात. हा देश म्हणजे कॅरेबियन समुद्रातील अतिशय छोटी काही बेटे आहेत. असा फंड त्या देशात जमा करणे किंवा तेथील रियल इस्टेटमध्ये 2.7 कोटी रुपयांची किंवा व्यवसायात 10.3 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे, अशा त्या देशाचे नागरिक होण्याच्या अटी आहेत. त्यामुळे आपल्या मूळ देशात गैरव्यवहार करून काही श्रीमंत लोक या देशाचे नागरिक होतात. हे केले की त्या देशात राहण्याची सुद्धा गरज नाही. पाच वर्षांत पाच दिवस हजेरी लावली की झाले! निरव मोदी आणि चोक्सी यांच्या पलायनामुळे हे देश सध्या चर्चेत आहेत.

गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरमध्ये एक किलो चहाला 39 हजार एक रुपये इतका विक्रमी दर मिळाला. या सेंटरमध्ये चहाच्या विशेष जातींच्या चहाचा लिलाव होतो. गेल्या आठवड्यात तेथे मनोहारी गोल्ड टी चा लिलाव झाला. दिल्ली आणि अहमदाबादच्या ग्राहकांसाठी गुवाहाटीच्या सौरभ टी ट्रेडरने ती विकत घेतली. चहाची ही अतिशय पुरातन जात असून तिचे उत्पादन दिब्रुगडजवळ मनोहारी टी इस्टेटमध्ये होते. एक किलो चहाला मिळालेला हा जगातील विक्रमी दर असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औषधांच्या किंमती वाढू नयेत म्हणून 2013 मध्ये सरकारने कायदा केल्यानंतर आतापर्यंत नागरिकांची 11 हजार 463 कोटी रुपयांची बचत झाली. या कायद्यानुसार आतापर्यंत 951 औषधे आणि काही यंत्रांच्या किंमतीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)