अँटिबॅक्टेरिअल शेवग्याच्या शेंगा

कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा

शास्त्रीय नाव मॉरिंगा ऑलिफेरा असं असून इंग्रजीत याला ड्रमस्टिक असं म्हणतात. तर हिंदीत याला सहजन, सुजना, सेंजन, मुनगा अशी नावं आहेत. मॉरिंगेशिए कुळातली मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणारी वनस्पती आहे. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील ही वनस्पती असून तिची फुलं, पानं तसंच शेंगाचा वापर पाककृती करण्यासाठी होतो. या शेंगांच्या बियांपासून निघणारं तेल घडयाळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वंगण म्हणूनही वापरतात.

  1. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी र्निजतुक करण्यासाठी वापरलं जातं. तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. म्हणजे आराम पडतो. यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. जेणेकरून हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. ज्युस किंवा त्याचा रस नियमित आहारात समाविष्ट हाडं मजबुत होतात.

  2. रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे.

  3. घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी म्हणजे त्रास कमी होतो.

  4. गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं, जेनेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसुतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध याच्या सेवनाने वाढतं. आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते. मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस 21 दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते.

  5. अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही कम करते. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो. उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.