भारताचे तुकडे पडण्याची पाकिस्तानला स्वप्ने

शेतकरी आंदोलन पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा पुरावा

नवी दिल्ली – गेले 75 दिवसांहून अधिक काळ राजधानी नवी दिल्लीच्या सीमांवर पंजाब-हरयाणामधील शेतकरी आंदोलन करत असून, केंद्र सरकारचे नवे शेतकरी कायदे रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. प्रजासत्ताक दिनाला, 26 जानेवारीला या आंदोलकांनी दिल्लीमध्ये काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळाले आणि एका पंजाबी युवकाने ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाशेजारी खलिस्तानचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे, हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसून देशविघातक शक्तींचे असल्याच्या केंद्र सरकारच्या दाव्याला पुष्टी मिळाली होती.

आता या दाव्याचे रुपांतर खात्रीमध्ये होत असून ए एन आय या वृत्तसंस्थेच्या ट्‌वीटर हॅंडलवर पोनप्पा चेप्पुदिरा नामक व्यक्तीने पाकिस्तानमधील घोषणाबाजीचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याच्या घोषणा दिल्या जात आहेत.

कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या लोकसभेतील कालच्या भाषणाच्या ट्‌वीटला उत्तर देताना पोनप्पा चेप्पुदिरा यांनी हा वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतातील आंदोलकांनो, तुम्ही आंदोलनापासून तसूभरही मागे हटू नका, पाकिस्तानची 22 कोटी जनता खलिस्तानच्या मागणीच्या पाठीशी आहे. आता भारताचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता आसाम, काश्‍मीर, हैदराबाद आणि जुनागड स्वतंत्र होईल. पंजाब खलिस्तानचा असून काश्‍मीर पाकिस्तानचा भाग असल्याच्या घोषणाही यात देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातून आम्ही भारताला संदेश देऊ इच्छितो की, लवकरच पंजाबमध्ये खलिस्तानचे आणि काश्‍मीरमध्ये पाकिस्तानचे राज्य येईल. या व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की, हिंदुस्तान का एक इलाज… अल-जिहाद… अल-जिहाद… घोषणा देणारा नेता म्हणतो की, इतक्‍या मोठ्या आवाजात घोषणा द्या की, त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यापर्यंत पोहोचतील.

त्यामुळे केंद्र सरकार जे म्हणते आहे की, शेतकरी आंदोलनामागून दहशतवादी शक्ती शिरजोर होत आहेत, त्या दाव्याला या व्हिडीओमुळे पुष्टी मिळत असून हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.