नवी दिल्ली – एनएसयूआय या कॉंग्रेसप्रणित संघटनेने बीबीसीने मोदींवर जो वादग्रस्त माहितीपट प्रकाशित केला आहे त्याचे दिल्ली विद्यापीठात प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे.
तथापि, विद्यापीठ प्रशासनाने या प्रदर्शनाला प्रतिबंध केला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही या प्रकरणी पोलिसांनी माहिती कळवली असून या प्रदर्शनाला अनुमती दिली जाऊ नये, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. भीम आर्मीनेही हा माहितीपट स्वतंत्रपणे प्रदर्शित करण्याचे जाहीर केले आहे.
मोदी सरकारने या माहितीपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्याची सूचना सोशल मीडिया कंपन्यांना केली आहे. त्यानंतर देशातील अनेक विद्यार्थी संघटनांनी हा माहितीपट प्रदर्शित करण्याचे कार्यक्रम एकामागोमाग एक पद्धतीने जाहीर केल्याने गेले नाही दिवस शिक्षण संस्थांच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.