रानू मंडलच्या ट्रोलिंगविषयी हिमेशने हसत दिलं हे उत्तर

मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.


रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु आहे. कधी उद्धट बोलण्यावरून तर कधी फॅन्सला दिलेल्या प्रतिसादवरून ट्रोल केले गेले तर आता तिच्या न्यू लुकमुळे चांगलेच ट्रोल केले जात होते.

यावर यानंतर रानू मंडलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये रानू मंडलचा उद्धटपणा देखील तिच्या चाहत्यांना दिसला. यावर एका पत्रकार परिषदेत हिमेश रेशमिया यांना रानू मंडलच्या ट्रोलबाबत प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिलं की, ‘मी त्यांचा काही मॅनेजर नाही.’ सध्या त्यांचा या उत्तरामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा राणू मंडल आणि हिमेश यांचे मिम्स वायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.