अंशुला कपूर म्हणाली, मला आयुष्यात अभिनय जमणार नाही

बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर म्हणाली, आयुष्यात मला अभिनय करता येईल, असे वाटत नाही. दरम्यान, कपूर कुटुंबातील अनेकांनी चित्रपटसृष्टीत आपले नाव कोरले आहे. 26 वर्षीय अंशुला कपूर म्हणाली, माझया कुटुंबाची या क्षेत्रात आणि पेशात खूपच रुचि राहिलेली आहे. लहानपणी मला काय करावे हे माहित नव्हते. तसेच अभिनय मला कधिच आवडला नाही.

अंशुला म्हणाली, मी जेव्हा शाळेत असताना अभिनय करायची, तेव्हा मी मला घराबाहेर पडणे खूपच अवघड जात होते. मला मंचावर परफॉर्म करताना खूपच भिती वाटायची. मी जेमतेम 20 लोकांसमोरही बोलू शकत नव्हती. पण माझी आई मला प्रोत्साहित करत होती.

दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक पक्ष तिच्यासाठी खूपच चांगला ठरला असून तिच्या मते, फॅनकाईडच्या माध्यमातून ती मनोरंजन क्षेत्राशी थोडीफार जुळलेली आहे. त्यामुळे मी अभिनय करणार नाही, असे अंशुलाने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.