नवी दिल्ली – स्टेट बॅंकेत कार्यरत असलेल्या अंशुला कांत यांचे जागतिक बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्त अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या अंशुला स्टेट बॅंकेत मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून 38 अब्ज महसुलाचे व्यवस्थापन करतात. अंशुला यांच्या निवडीची घोषणा जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मलपास यांनी केली. ते म्हणाले की अंशुला यांच्याकडे वित्तीय क्षेत्रातील 35 वर्षांचा अनुभव आहे.