नवी दिल्ली : आशियाई अंजिक्यपद कुस्ती स्पर्धेत अंशू मलिक (५७ किलो) आणि गुरशरण प्रीत कौर (७२) या भारतीय महिला कुस्तीपटूनी कांस्यपदके पटकावली. तर याच स्पर्धेत आधीच्या सामन्यात साक्षी मलिकने रैप्य आणि विनेश फोगटने कांस्यपदक पटकावले. दिल्ली येथील खाशाबा जाधव बंदीस्त कुस्ती संकुलात ही स्पर्धा सुरू आहे.
.@SakshiMalik won a gallant silver medal at the #AsianWrestlingChampionships in women’s 65 kg. #TOPSAthlete @Phogat_Vinesh won bronze in women’s 53 kg, her 7th medal at this c’ship. Anshu (57 kg) and Gursharanpreet (72 kg) won bronze as well.@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice pic.twitter.com/ePkYb15mxE
— SAI Media (@Media_SAI) February 21, 2020
स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत ५७ किलो वजनी गटात अंशू मलिकने उझबेकिस्तानच्या सेव्हारा ईशमुरोतोव्हाचा ४-१ ने पराभव करत विजय नोंदविला.
तर, दुसरीकडे याच स्पर्धेत ७२ किलो वजनी गटात गुरशरण प्रीत कौर हिने मोंगोलियाच्या त्सेव्हेगमेड इन्खबायार हिचा ५-२ असा पराभव करत विजय नोंदविला. ६२ किलो वजनी गटात सोनम मलिकने मात्र निराशा केली.