आणखी एका महिलेने केला ट्रप्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावर दोन दशकांपुर्वी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आज आणखी एका महिलेने केला आहे. या आधीही काहीं महिलांनी त्यांच्यावर असे आरोप केले आहेत. त्यांच्यावर नव्याने आरोप करणारी महिला लेखिका आहे आणि ती न्युयॉर्क मधील रहिवासी आहे. दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र ही बोगस बातमी आहे असे नमूद करीत हा आरोप फेटाळून लावला आहे.

ई जीन कॅरोल असे ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या नव्या पुस्तकात हा आरोप करताना त्या विषयीचा तपशीलही दिला आहे. ट्रम्प यांच्याशी आपली आधी ओळख होती. नेहमी त्यांच्याशी आपला संवाद होत असे. न्युयॉर्क मधील एका डिपार्टमेंट स्टोअरच्या ड्रेसिंग रूम मध्ये ते अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्यावर बलात्कारच केला असे या महिलेने या पुस्तकात म्हटले आहे. या महिलेसह एकूण सोळा महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

सध्या कॅरोल ही महिला 75 वर्ष वयाची आहे. दरम्यान ट्रम्प यांनी कॅरोल नावाच्या महिलेला आपण ओळखतही नाही असे म्हटले आहे. आपले नवे पुस्तक वेगाने खपावे म्हणून तिने ही बनावट स्टोरी रचली असावी असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तक विक्री सारख्या छोट्या उद्दीष्ठातून असे आरोप करणाऱ्या महिलांचा आपण निषेध करतो असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.