करोनाच्या विळख्यातून नुकत्याच सावरलेल्या युरोपमध्ये पुन्हा एकदा करोनाची दुसरी लाट आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रीटनसह अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊनसह विविध ठिकाणी अनेक निर्बंध लावले आहेत.
युरोपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आल्यानंतर नागरिकांमध्ये परत भीतीचे वातावरण पसरले आहे. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील काही भागांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध लावले आहेत.
विविध देशांत सोमवारपासून लॉकडाउन लावले जाणार असून प्रत्येकाला मास्क व फेस शिल्डचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाचा धोका सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात स्पेन व इटलीत सर्वाधिक फटका बसला होता.
ब्रिटनमध्ये दोन दिवसांत करोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास 5 हजार लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशात ज्या शहरांत हा प्रभाव जास्त आहे तीथे लॉकडाऊनसह अनेक नियम नव्याने लावले गेले आहेत.
अन्य ठिकाणी जनजीवन सामान्य राहावे यासाठीही या देशांच्या सरकारकडून बार आणि रेस्टोरंट्स, नाइट क्लब्सला वेळेचे बंधन लावले गेले आहे.