Pooja Khedkar Mother | ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह कुटूंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमाकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामधे त्या मेट्रो अधिकारी आणि पोलीसांसोबत हुज्जत घालताना दिसता आहेत.
२०२२ मधील ही घटना असून पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ते रेकॉर्ड केले. खेडकर कुटुंबाचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कामासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्या हमोरील फुटपाथवर ठेवले होते.
त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यां सोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकार्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.
काय आहे व्हिडीओत?
तुम्ही कायदा हातात घेत दांडे आणि कुऱ्हाडी घेऊन येताय मग कोणाला सांगायचे. आम्ही कशासाठी आलोय. तुमचे काम नाही का आमच्याशी बोलायचे, असा सवाल पोलीस मनोरमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. पोलीस त्यांना विचारत असताना एक तरुण येऊन त्यांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी कॅमेरासमोर हात धरताना दिसत आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर पिस्तुल प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन
पुण्यातील IASची ट्रेनिंग घेणारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन करण्यात आलं आहे. पानशेत परिसरातील शेतकरी आणि जागृत पुणेकरांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे. पिस्तुल रोखून हुसकवण्याची भाषा करणाऱ्या खेडकर कुटुंबियांविरोधात पैसे मागून भीकमागो आंदोलन करण्यात आलं आहे तसेच आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात आली आहे.