भोपाळ – प्रल्हादसिंह पटेल यांच्या रूपाने आणखी एका केंद्रीय मंत्र्याला करोनाची बाधा झाली. करोनाविषयक चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.
भाजपचे नेते असणारे पटेल मध्य प्रदेशातील दमोह मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि करोनाविषयक चाचणीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
याआधी अमित शहा, नितीन गडकरी, श्रीपाद नाईक, धर्मेंद्र प्रधान, कैलाश चौधरी, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र शेखावत आणि सुरेश अंगडी या केंद्रीय मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला.
त्याशिवाय, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांसारख्या उच्चपदस्थांनाही करोनाबाधा झाली.