फडणवीसांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश
मुंबई – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून इन ऍक्शन आले आहेत. ठाकरे सरकराने भाजपला आणखी एक दणका दिला आहे. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासकामांचा समावेश आहे. या कामांना दोन कोटींपासून २५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळाले होते.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामे, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे, यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम या अंतर्गत मंजूर झालेल्या २०१९-२० सालातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अजूनही वर्क ऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिले आहे.
दरम्यान, कामांचे वाटप करताना भाजपसरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांच्या आमदारांनी केला होता.