जळगाव – रावेर आगारातील एसटी बस चालकाने आत्महत्या केली आहे. कन्हैय्या भिका अटकाळे (वय 47) असे आत्महत्या केलेल्या बसचालकाचे नाव आहे. अटकाळे यांनी राहत्या घरी थेरोळा (ता. रावेर) येथे आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर आगारात कन्हय्या अटकाळे हे चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शनिवारी (ता. 12) रात्री उशिरा घराच्या छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलिस अधिक तपास करत आहेत. अटकाळे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, राज्यात विलिनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप आदोलन सुरु आहे. संप सुरु झाल्यापासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.