अलाहाबाद – उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. आता महोबा येथील 19 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमात दुर्गा पूजेनंतर ही तरुणी आपल्या घरी जात होती. यानंतर तीन तरुणांनी रस्त्यावरून तिचं अपहरण केलं आणि निर्जन जागी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पानवाडी भागात बलात्काराची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणी पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
हाथरस येथील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असूनही, उत्तर प्रदेशात एकामागून एक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याने, योगी सरकार अडचणीत येत आहे.