भिगवण स्टेशनमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह

बाराजणांचे अहवाल प्रतीक्षेत
भिगवण गावठाण, डिकसळ, तक्रारवाडीत प्रशासन सतर्क
भिगवण (वार्ताहर) –
येथील रेल्वे स्टेशन प्रभागात (दि.11) एका करोना पॉझिटीव्ह महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या संपर्कातील चौदा लोकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी दोन अहवाल आले असून त्यापैकी एका व्यक्‍तीस लागण झाल्याची माहिती भिगवणचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल कुंपुभार यांनी दिली.

महिलेस अगोदरच्या आजारांची पार्श्‍वभूमी असल्याची माहिती मिळत आहे. त्या महिलेसोबत असलेल्या दोन व्यक्‍तीपैकी महिलेच्या बहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. भिगवण स्टेशन परिसर बंद करण्यात आला आहे. बफर झोनमधील भिगवण गावठाण, डिकसळ, तक्रारवाडी येथेही प्रशासन सतर्क झाले आहे.

बाधित व्यक्‍तीच्या दूरच्या संपर्कातील 18 लोकांना त्यांच्या घरीच क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. भिगवणला आजअखेर बाधितांची संख्या 3 इतकी झाली आहे. यापैकी दोन व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. आज बाधित झालेली महिला ही भिगवण गावठाणातील एका कापड दुकानात काम करीत होती. त्यामुळे भिगवणकरांना करोनाचा धोका कायम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.