नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा शहरामध्ये पुन्हा करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येथे यापूर्वी तीनजण करोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील एकजण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे.
नेवासा शहरात 30 मार्च रोजी मरकस मज्जिदीमध्ये विदेशातील 10 व्यक्ती वास्तव्यास असल्याच्या माहितीवरून छापा टाकून मज्जिदचे दोन ट्रस्टी तसेच विदेशातील एकूण 10 जणांना ताब्यात घेतले होते. या 10 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक विदेशी नागरिक करोना पॉझिटीव्ह आढळून आला होता.उर्वरित 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दि. 18 मार्च रोजी केलेल्या तपासणी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
थर्मलगनने होणार करोना सर्वेक्षण
तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता घरोघर जाऊन आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सेविका यांचेकडून थर्मलगन मार्फत संपूर्ण तालुक्याचे करोना सर्वेक्षण कमृरणार असून नागरिकांनी माहिती न लपवता सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी केले आहे.