उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेश पोलिसांची राज्यातील गुंडाविरोधात धडक कारवाई जोरात सुरु आहे. गेल्या 23 दिवसात 3 गुंडाचा एन्काऊंटर करण्यात यूपी पोलिसांना यश आलंय. अशातच आणखी एका कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर केला आहे.
यूपी एसटीएफने गुरुवारी कुख्यात गुंड अनिल दुजाना याचा एन्काऊंटर केला आहे. यूपी एसटीएफ आणि अनिल दुजाना टोळी यांच्यात थेट चकमक झाली, ज्यामध्ये अनिल दुजाना ठार झाला आहे. अनिल दुजाना याच्यावर अडीच लाखांचे बक्षीस होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये अनिल दुजाना याची दहशत होती. आठवडाभरापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून सुटका होताच त्याने गौतम बुद्ध नगरमध्ये आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्या लोकांना धमकावले होते. मात्र, त्यानंतर अखेर पोलिसांना त्याचा एन्काऊंटर करण्यात यश आले आहे.