सेक्रेड गेम्स-2 चा आणखी एक नवा टिझर रिलीज

बहुप्रतिक्षित वेब सीरिज “सेक्रेड गेम्स 2″चा अधिकृत ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्‍सवर स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट 2019 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली. ही उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवरुन या सीरिजचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

सेक्रेड गेम्स 2 ट्रेलरची सुरूवातच गायतोंडेने बंटीला केलेल्या फोनने होते. त्यामुळे अनुत्तरीत प्रश्‍न असलेले त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘सेक्रेड गेम्स 2’ मध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, दिलबाग सिंग, सरताज सिंग, बंटी यांच्याभोवती ही कहाणी फिरते. त्याच बरोबर बहु प्रतिक्षीत गुरूजी हे पात्र देखील यंदाच्या मोसमात उलगडले जाणार आहे. तसेच, या सीझनमध्ये इतर कलाकारांसोबत कल्की कोचलीन, रणवीर शौरे हे दोन नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन अनुराग कश्‍यप, विक्रमादित्य मोटवाणीने मिळून दिग्दर्शित केला होता. दुसरा सीझन अनुराग कश्‍यप, नीरज घेवानने दिग्दर्शित केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.