दुसरी नोटाबंदी की आणखी काही ते सांगू शकत नाही; पण…

सुरेश प्रभूंच्या वक्तव्याने टाकले बुचकळ्यात
पणजी – दुसरी नोटाबंदी शक्‍य आहे का, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे उत्तर दिले. सांगू शकत नाही, असे नमूद करतानाच त्यांनी काळ्या पैशांच्या विरोधातील मोहिमेसाठी राजकीय किंमत मोजण्यास मोदी सरकार तयार असल्याचे म्हटले.

भाजपच्या प्रचारासाठी गोव्यात आलेले प्रभू पत्रकारांना सामोरे गेले. दुसरी नोटाबंदी होणार का, असे पत्रकारांनी विचारल्यावर ते उत्तरले, आणखी एका नोटाबंदीची किंवा आणखी कशाची गरज आहे का, ते मी सांगू शकत नाही. मात्र, काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यास सरकार वचनबद्ध आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. प्रशासनात पूर्ण पारदर्शकता आणली तर करचुकवेगिरी टाळली जाईल. कर भरण्याशी संबंधित व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदीची घोषणा केली. मोदी सरकारच्या कार्यकाळातील तो वादग्रस्त निर्णय ठरला. नोटाबंदीचे प्रतिकूूल परिणाम झाल्याचा दावा करत विरोधक त्या निर्णयावरून अजूनही सरकारला लक्ष्य करत आहेत. तर कराचा पाया विस्तारल्याचे आणि डिजिटल व्यवहार वाढल्याचे सांगत सरकारकडून त्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)