देशभरामध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून विविध राजकीय पक्षांद्वारे युती आणि आघाडीची नवनवीन गणिते मांडली जात आहेत. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे आता पक्ष आदलाबदलीच्या घडामोडींना देखील विशेष वेग प्राप्त झाला आहे. अशातच आज उत्तर प्रदेशात निषद पक्षाचे नेते प्रवीण निषद यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
Delhi: Nishad Party leader and Gorakhpur (UP) MP Praveen Nishad joins Bharatiya Janata Party. Nishad Party to support BJP in Uttar Pradesh in upcoming Lok Sabha elections. pic.twitter.com/Aqk5X2ZeAu
— ANI (@ANI) April 4, 2019
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये निषद पक्ष भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे देखील याआधीच स्पष्ट करण्यात आले असून आता निषद पक्षाचे नेते तथा गोरखपुरचे खासदार प्रवीण निषद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.