‘करोना’बाधित देशातून आलेला आणखी एक जण दाखल

पुणे -“करोना’बाधित देशातून आलेल्या एका व्यक्तीला सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यामुळे शनिवारी (दि. 8) रात्री नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तर राज्यात आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, नवी मुंबई, सांगली यासह अन्य शहरातून एकूण 36 प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 31 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, अन्य 5 जणांचे नमुने उद्यापर्यंत येतील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 21 हजार 203 प्रवासांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 151 प्रवासी “करोना’ बाधित भागातून आले आहेत. त्यापैकी 30 जणांना घरी सोडण्यात आले असून, मुंबई येथील कस्तुरबा आणि पुण्यातील नायडून रुग्णालयात प्रत्येकी दोन तर नवी मुंबई आणि सांगली येथे प्रत्येकी 1 रुग्ण दाखल असून, त्यातील एकाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जहाजावरील प्रवाशांना “करोना’ नाही
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील रेडी बंदरावर सिंगापूर येथून एक मालवाहू जहाज आले आहे. या बोटीवर दहा चिनी व्यक्तींसह 22 व्यक्ती आहेत. आत्र, या जहाजाने तीन आठवाड्यांपूर्वी सिंगापूर सोडले असून, यातील चिनी व्यक्तींनी तीन महिन्यांपूर्वीच देश सोडलेला आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी मुंबई पोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेली असून, त्यामध्ये कोणालाही लक्षणे आढळून आली नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.