कौटुंबिक न्यायालयात अंधश्रध्देची ‘नजर’

पिवळी मोहरी टाकणाऱ्या 64 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात ; महिन्यात दुसऱ्यांचा अंधश्रध्देचा प्रकार 
पुणे: खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी पक्षकार विविध उपाय शोधत असतात. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील घटस्फोटाच्या प्रकरणात एका 64 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने खटल्याचा निकाल आपल्या मुलीच्या बाजूने लागावा यासाठी अंधश्रध्देतून चक्क पिवळी मोहरीचा न्यायालयात टाकण्याचा प्रयत्न शनिवारी केला. दरम्यान या महिण्यातील हा दुसरा प्रकार असून यापूर्वी कौंटूबिक न्यायालयातील पहिल्या मजल्यावर अर्धवट कापून कुंकु लावून टाकलेले लिंबू आढळले होते. त्याचा तपास सुरू आहे.

कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी, मुलांचा ताबा, आई वडीलांकडून मुलांकडे होणाऱ्या पोटगीची मागणी अशा प्रकारचे खटले दाखल होतात. कौटूंबिक न्यायालयातील न्यायाधिश सुभाष कापरे यांच्या न्यायालयात एक घटस्फोटाचा खटला सुरु आहे. यातील पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित असून त्यांना 10 वर्षांची मुलगी आहे. पत्नी अमेरिकेतील एका खासगी कंपनीत कामाला असून मुलगी तीच्या बरोबरच राहते. तर पती हा पुण्यातील एका कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. अमेरिका सोडून लवकरात लवकर पुण्यात यावे अन्यथा घटस्फोट घेण्याचा निर्णय पतीने घेतला होता. त्याविरोध पत्नीने कौंटूबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. दोन वर्षांत पुण्यात परत येणार आहे. त्यामुळे हा घटस्फोट घेवू नये असा पवित्रा तिने घेतला आहे. शनिवारी या खटल्याची सुनावणी होती. यावेळी मुलीच्या वडिलांना हा घटला आपल्या मुलीच्या बाजूने लागावा यासाठी पिवळी मोहरी खटला सुरू असणाऱ्या कोर्ट रूम समोर टाकली.

यावेळी त्यांना न्यायालयातील पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी दिवाळी अंकात पिवळ्या मोहरी जर टाकली तर निकाल आपल्या बाजून लागतो असे वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे म्हणाल्या, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात असे प्रकार घडणे योग्य नाही. जादुटाणा विरोधी कायद्याची सरकारने कडकपणे अंमलबजावणी करावी. अंधश्रध्देच्या अशा घटना घडू नये, यासाठी समाज प्रबोधन करावे. अंधश्रध्देने केलेल्या कोणत्याही कृत्याचा परिणाम खटल्यावर होत नसतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)