बेंगळुरू : कर्नाटकमधील कंबाला म्हणजेच म्हैस किंवा बैलांबरोबर पाणी साठलेल्या शेतामध्ये धावण्याच्या शर्यतीत गौडा याने ९.५५ सेंकदात १०० मीटर अंतर पार करत जमैकाचा आॅलिम्पिंक धावपटू उसेन बोल्टला आव्हान दिले होते. आता गौडापेक्षाही जास्त सरस कामगिरी निशांत शेट्टी या तरूणाने नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
https://twitter.com/srikanthbjp_/status/1229751629303255040?s=19
माध्यमांनी गौडाला भारताचा उसेन बोल्ट असेही म्हटले होते. खासदार शशी थरूर तसेच उद्योजक आनंद महिंद्रा यांनी गौडाच्या कामगिरीची दखल घेत क्रीडा मंत्रालयाला त्याला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. केंद्रीय क्रीडांमत्री किरण रिजीजू यांनी साईमध्ये गौडाची चाचणी घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, गौडाने हा प्रस्ताव फेटाळला होता.
गौडाची चर्चा सुरू असतानाच निशांत शेट्टी याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. वेणूर गावातील शर्यतीत निशांत शेट्टीने ९.५१ सेकंदात १०० मीटर अंतर पार करत गौडाच्या कामगिरीला मागे टाकले. आता केंद्रीय क्रीडा मंत्रालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.