कोलकता – जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेच्या आणखी एका दहशतवाद्याला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे त्या राज्यात मागील पाच दिवसांत जेएमबीचे चार दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत.
उत्तर 24 परगणा जिल्ह्यात बुधवारी रात्री एका दहशतवाद्याला पकडण्यात आले. लालू सेन उर्फ राहुल सेन उर्फ राहुल कुमार असे त्याचे नाव आहे. बांगलादेशातून आलेल्या तीन दहशतवाद्यांना रविवारी बंगालमध्ये अटक करण्यात आली.
त्यांना विविध स्वरूपाची मदत राहुलने पुरवल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले. जेएमबीच्या 15 दहशतवाद्यांनी काही महिन्यांपूर्वी बांगलादेशातून भारतात शिरकाव केला. त्यातील तिघांना बंगालमध्ये पकडण्यात आले. इतरांनी जम्मू-काश्मीर, बिहार आणि ओडिशात आश्रय घेतल्याचा संशय आहे.