नवी दिल्ली – चीन सैन्याकडून सुरु असलेल्या कुरापतींमुळे भारत-चीन सीमेवरील तणाव वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. चीन सैन्याकडून आज पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून चिन्यांचा हा डाव देखील भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील चीनच्या चेपुझी कॅम्पकडून चीन सैन्याची ७ ते ८ अवजड वाहने भारतीय भूभागाकडे कूच करत होती. ही बाब निदर्शनास येताच भारतीय जवानांनी संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली.
In a significant development, Indian security forces today foiled an attempt by the Chinese Army to transgress into the Indian side of the Line of Actual Control in the general area of Chumar: Sources
— ANI (@ANI) September 1, 2020
भारतीय सैन्याच्या हालचाली लक्षात येताच चीन सैनिकांनी भारताकडे निघालेला आपला ताफा मागे वळवला. मात्र या घटनेनंतर भारतीय जवानांना प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक खडा पहारा देण्याचे आदेश देण्यात आले असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Around 7 to 8 heavy vehicles of the Chinese army set off towards the Indian side of the Line of Actual Control from their Chepuzi camp. In reaction, the Indian security forces also made precautionary deployments to prevent any intrusion: Sources
— ANI (@ANI) September 1, 2020
सीमेवरील घडामोडींबाबतचे वृत्त एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
Seeing the vehicles from the Indian side along with troops, the Chinese vehicle convoy returned back towards their bases. Indian security forces are on high alert all along the LAC to prevent any incursion by the Chinese in any sector: Sources
— ANI (@ANI) September 1, 2020