नेहा धुपियाकडे आणखी एक गुडन्यूज

नेहा धुपिया आणि अंगद बेदीने मिळून अलीकडेच एक गुडन्यूज दिली आहे. आपल्या दुसऱ्या बाळाची चाहुल लागल्याचे या दोघांनी सांगितले आहे. 

या दामंप्त्याला यापूर्वीच एक मुलगी झाली आहे. या मुलीचे नाव मेहर आहे. आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे, हे समजल्यावर मेहर जाम खूष झाली आहे, असे अंगदने एका व्हिडीआमध्ये म्हटले आहे.

मेहर आता खूपच छोटी आहे आणि तिला अजून नक्‍की काय होणार हे देखील समजत नसे. पण आपल्याला एक भाऊ किंवा बहीण मिळणार आहे, एवढे तिला समजले आहे. आपल्या सर्व गोष्टी शेअर करायचे तिने ठरवले आहे. त्यामुळेच ती जाम खूष आहे.

नवीन बाळाबाबत इतकी उत्सुकता एखाद्या लहान मुलीमध्ये क्वचितच बघायला मिळते. लहान मुलाच्या जन्मानंतर आईचे पूर्ण लक्ष स्वाभाविकपणे नवीन बाळाकडे केंद्रीत होणे स्वाभाविक आहे.

तसे जरी झाले तरी आपल्या मेहरला काहीही वाटणार नाही. कारण तिचे लक्षही आपल्या नवीन भावंडाकडे असणार आहे, असे अंगद बेदीने म्हटले आहे. आता यथावकाश नेहा धुपियाकडून अपडेट मिळत जातील.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.