अक्‍कीने साईन केला आणखी एक चित्रपट, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अक्षयकुमार हा इंडस्ट्रीतील बिझी स्टारपैकी एक आहे. त्याचे अनेक चित्रपट दरवर्षी रिलीज होतात. पण यंदा करोना महामारीमुळे त्याचा फक्त एकच चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, अक्षयचे अनेक चित्रपट रिलीज होण्यासाठी प्रतीक्षेत असून काही चित्रपटांचे शूटिंग अद्याप सुरू झाले नाही. दरम्यान, अक्षयकुमारने आणखी एक चित्रपट साईन केला आहे. 

अक्षयकुमार पुन्हा एकदा “मिशन मंगल’चे दिग्दर्शक जगन शक्तीसोबत काम करणार आहे. अक्षयकुमारच्या बॅनर केप ऑफ गुड फिल्म्सने एका चित्रपटासाठी जगन शक्‍तीला साइन केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2021 च्या अखेरीस सुरू होईल आणि त्यानंतर 2022 मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाची स्क्रिप्ट सध्या लिहिली जात आहे. निर्मात्यांना हा चित्रपट 38 दिवसांत पूर्ण करायचा आहे. महत्त्वाचे म्हणजे “मिशन मंगल’ चित्रपटाचे शूटिंग 28 दिवसांत झाले होते. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अक्षयकुमारने यंदा दिवाळीनिमित्त आपल्या आगामी “राम सेतु’ चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय एका पुरातत्व तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे.

दुसरीकडे रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ चित्रपटातून तो पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 2021च्या पहिल्या तिमाहीत प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.